सिंगापूरमधील चांगी सगळ्यांना माहिती असते ते तिथे जगातील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक विमानतळ तिथे असल्याने. काही जणांना तिथली सुंदर चौपाटी आणि बोर्ड वॉक पण माहिती असतो. पण तिथे अजून एक गोष्ट विशेष आहे, तिथे एक जुने रामाचे मंदिर देखील आहे. Sree Ramar Temple, Changi, Singapore पूर्वाभिमुख मंदिर, गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी सज्ज असलेली देवता, तीन मंदिरांचे इथे झालेले एकत्रीकरण इतकेच त्या मंदिराचे वैशिष्ट्य नाही. त्याच्या स्थापनेची कथा देखील विशेष आहे. ब्रिटिश भारतीय सैन्यातील एका सैनिकाने एका झाडाखाली रामाची आराधना करण्यास सुरुवात केली. आसपासच्या गावातील लोक दर्शनाला येऊ लागले. हो! तेव्हा सिंगापूरमध्ये लहान लहान गावे, वस्त्या होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर, अथक धडपड करून तो सैनिक म्हणजे श्री. रामा नायडू ब्रिटिश राज्यकर्त्यांकडून तिथे मंदिर बांधण्याची अनुमती आणि जागा मिळवण्यात यशस्वी झाले. बांधकाम सुरु झाले. मंदिर भक्तांनी गजबजू लागले. हे मंदिर दुसऱ्या ठिकाणी हलवावे अशी मध्यंतरी एकदा मागणी झाली होती. रस्त्यांचे रुंदीकरण किंवा त्या भागातील ...