Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

हम्पी- विठ्ठल मंदिर

तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले  हम्पी . तिसऱ्या शतकापासून ह्या शहराचे उल्लेख आहेतच.  चौदाव्या शतकातल्या विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले  हम्पी .  विजयनगर साम्राज्यासोबतच  या शहराची देखील प्रगती  झाली आणि जगातले  एक अत्यंत श्रीमंत, भरभराटीला आलेले शहर म्हणून हम्पी मान्यता पावले. विदेशातून देखील व्यापारी  हम्पी ला येत असत.  चौदाव्या शतकाच्या आधीदेखील तिसऱ्या शतकापासून इतकेच काय, अगदी रामायण कालात देखील  हम्पीचे  उल्लेख आपल्याला सापडतात. अजून देखील ऋष्यमुक सारखी पर्वतांची नावे असतील किंवा पम्पा सरोवर, किष्किंधा अशी ठिकाणांची नावे असतील, आपल्याला सतत रामायणाचा संदर्भ दिसत राहतो. हनुमानाचे जन्मस्थान, राम लक्ष्मण हनुमानाला भेटले ते ठिकाण देखील ह्याच परिसरात आहे. त्यामुळे अनेक भाविक नेहमीच  हम्पी ला भेट देत असतात. इतिहास संशोधकांसाठी, कलेच्या अभ्यासकांसाठी देखील  हम्पी  फार महत्त्वाचे आहे ते त्यातील एकाहून एक सुंदर, कोरीव काम असलेल्या मंदिरांमुळे! युनेस्कोने देखील या संपूर्ण भागाला जागतिक वारसा स्थळ म्हणून मा...