लुआंग प्रबांग एकदम संथ, शां त जीवनशैलीचे शहर आहे. इथे आल्यावर तुम्हाला तर वाटेल की जणू तुम्ही 1970च्या दशकात आहात! जीवनाची संथ गती, कमी गर्दीचे रस्ते, वैभवशाली संस्कृती व स्थापत्य, वातावरणातील अध्यात्मिकता, सुस्वभावी लोक आणि नैसर्गिक सृष्टीसौंदर्य या सर्वांमुळे लुआंग प्रबांग अगदी अनोखे शहर वाटते. लुआंग प्रबांगच्या जुन्या शहर भागातून निवांत फेरफटका मारणे आम्हाला खूप आनंददायी वाटले. या भागातील इमारती आणि कॉफी शॉप्स पाहून लुआंग प्रबांग ही फ्रेंच वसाहत होती त्याची आठवण होते. लुआंग प्रबांग (From Pikist.com) चुली वरचा स्वैपाक! सुंदर मंदिरे सजावट बौद्ध भिक्षु फुलं घ्या फुलं ..देवासाठी फुलं!! बौद्ध मंदिरे सगळीकडे, अगदी पावलोपावली दिसतात. Wat Sensoukhram एका मंदिरातील बुद्धाची सोनेरी मूर्ती That Makmo - Watermelon Stupa पूजाविधीतील एक भाग धर्म समर्पित तरुण उच्च शिक्षण !! अभ्यास असा करायचा असतो!!! उंच भिंतीवर बसून..म्हणजे ते उच्च शिक्षण होते !!! मुळात लुआंग प्रबांग या नावाचा अर्थच मुळी रॉयल बुद्ध मूर्ती असा आहे. बौद्ध मंदिरे आणि बौद्ध भिक्षू ह्या शहराला एक वे...