Skip to main content

Posts

Showing posts from April, 2024

Deoriatal Chandrashila trek - Part 2- - Sari to Deoriatal.

The next morning, the trek started with a steep climb!! At one point during the climb, we turned back and bade goodbye to the Sari base camp. It was not known whether we would successfully complete the trek or not. But I was sure that we will definitely come back with a life changing experience.   Sari Base camp  📷 Supan Shah The road was paved with rough stones. But while climbing I was telling myself that these stones were better than walking in the slippery soil. 📷 Pawan Gowda You can guess how much the climb was, from this photo, but if you want to know how we were climbing, there is a video! विडिओ - सम्राट दर्डा https://youtube.com/shorts/CJuWDSml8XU?feature=share The initial, few meters part of the road passed through populated areas. But the houses there were very few and sparse. Green fields were visible everywhere. Farming was done on the mountain slopes, by step method. This greenery enlivened the entire slope. The view 📷 Supan Shah 📷 Samrat Darda After walking on the ste

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 2 - सारी - देवरियाताल

दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेकला सुरुवात झाली तीच एका तीव्र चढणीने!! चढताना एका क्षणी मागे वळून आम्ही सारी बेस कॅम्पचा निरोप घेतला. परत येउ तेव्हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला असेल की नाही, ते माहिती नव्हते. पण अनुभवसमृद्ध मात्र नक्की होऊन परत येऊ ह्याची ग्वाही मनातच दिली. सारी बेस कॅम्प 📷 Supan Shah रस्ता ओबडधोबड दगडांनी तयार केलेला होता. पण भुसभुशीत मातीत पाय घसरण्यापेक्षा दगड परवडले असे मनाला सांगत चढण चढत होते. 📷 Pawan Gowda ह्या फोटोवरून चढ किती होता त्याचा तर अंदाज येईल पण आम्ही सगळे कसे चढत होतो ते कळायचे असेल तर व्हिडिओ आहे ना! विडिओ - सम्राट दर्डा https://youtube.com/shorts/CJuWDSml8XU?feature=share रस्त्याचा सुरुवातीचा काही भाग लोकवस्तीतून जाणारा. पण तेथील घरेही अगदी तुरळक आणि तशी लांब लांब. हिरवीगार शेते मात्र दिसत होती. डोंगर उतारावर पायऱ्यांसारखे बांध घालत केलेली ही शेती संपूर्ण उतार जिवंत करत होती. The view 📷 Supan Shah 📷 Samrat Darda तासभर तीव्र चढणीचा रस्ता पार केल्यानंतर थोडया वेळाने तुलनेने जरा सपाट भाग आला तेव्हा हृदयाने थँक्यू म्हणायला सुरूवात केली!! तिथून चंद्रशिल

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक- भाग 1 - तयारी !!

  आपण स्वप्न पाहतो… आपण स्वप्ने पाहतो… त्यातील एखाद दुसरेच प्रत्यक्षात यावे म्हणून धडपडतो आणि बाकीची स्वप्ने कधीतरी नवलाईने आंजारायला गोंजारायला असावीत म्हणून त्यांना स्वप्न म्हणूनच राहू देतो.  हाय अल्टिट्युड ट्रेक हे माझे एक असेच स्वप्न होते, नेहमी भुरळ पाडणारे आणि तरीही प्रत्यक्षात आले तर इतक्या उंचीवर चालताना काहीशी धास्तीच वाटावी असे. त्यामुळे वर्षानुवर्ष ते स्वप्न प्रत्यक्षात न येता स्वप्नच राहिले होते.  नोव्हेंबरमध्ये माझी मैत्रीण धनश्री जगताप इंडियाहाईक्सबरोबर देवरिया ताल चंद्रशिला हा ट्रेक करून आली. तिच्याशी गप्पा मारताना या ट्रेकची सविस्तर माहिती मिळाली. मार्च एप्रिलमध्ये या संपूर्ण रस्त्यावर ऱ्होडोडेंड्रॉनची फुले फुललेली असतात असेही कळले… आणि मनातल्या स्वप्नाला पुन्हा एकदा जाग आली.  असे म्हणतात की देवरिया ताल म्हणजे जिथे यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारले ते तळे. वाटेत लागणारे तुंगनाथ हे तर जगातले सर्वात उंचावर असणारे शंकराचे मंदिर, पंच केदारापैकी एक. हे पांडवांनी बांधले आहे असे सांगितले जाते. ट्रेकचा समिट पॉईंट म्हणजे चंद्रशिला. जिथे चंद्राने तपश्चर्या केली ती जागा. असेही म