आजदेखील सफरच आहे ... पण पक्षीराज्याची. हे सगळे पक्षी टिपायला कुठे जंगलात किंवा पक्षी अभयारण्यात जावे नाही लागले. हे आहेत भर मुंबईत, नागरी वस्तीत दिसलेले पक्षी. तसे तर आपल्या सगळ्यांनाच पक्षी दिसतात. पण त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा लक्षात ठेवून, कॅमेरा सज्ज ठेवून त्यांची छायाचित्रे घेणे काही प्रत्येकाला जमत नाही. त्यासाठी पारखी नजर आणि आवड हवी. ह्या सर्व सुंदर छायाचित्रांचे छायाचित्रकार आहेत डॉ. प्रफुल्ल चितळे. प्रत्येक छायाचित्र सुंदर आणि बारकावे टिपणारे. साधारणपणे, ' वा! छान!!" म्हणून आपण थांबतो. पण शब्दांचे ज्यांना वरदान असते ते जणू त्या छायाचित्रातील भाव शब्दात उतरवतात. प्रत्येक छायाचित्राला समर्पक ओळी लिहिल्या आहेत अंजली चितळे ह्यांनी. चला तर मग पक्षीजगताच्या प्रवासाला. मी म्हटले की हा पक्षीजगताचा प्रवास.. पण हा तर ठरला कलाजगताचा प्रवास. छायाचित्रकाराने काढलेली पक्ष्यांची सुंदर छायाचित्रे, ती पाहून कवयित्रीला सुचलेले शब्द आणि तेच पाहून कलावंतांना काढावीशी वाटलेली रांगोळी. आता ह्या पोस्टमध्ये काही रांगोळ्या पण समाविष्ट झाल्या आहेत! रा...