इंदूरजवळ देवधर्म नावाची टेकडी आहे. साधारण २००२ च्या सुमारास इंदौरवासियांनी ठरवले की ही उजाड, वैराण टेकडी हिरवीगार करू या. झाडे लावू या. पितरेश्वर परिसर. पितरेश्वर परिसर. पितरेश्वर परिसर. पितरेश्वर परिसर. हा संपूर्ण परिसर इतका हिरवागार आहे की भर दिवसा आपण घनदाट जंगलात आहोत असा भास होतो. आम्हाला तर इथे जंगलात मोर पण दिसला. कॅप्शन हवीये का?!! ह्या उपक्रमासाठी प्रयोजन होते पितरांच्या स्मरणाचे. आपल्या दिवंगत पितरांच्या स्मरणार्थ झाडे लावा असे आवाहन केले गेले. लवकरच इथे जवळपास एक लाख झाडे लावली गेली आणि मग ह्या भागाचे नावच पडले पितृ पर्वत. मग इथे एक हनुमानाची मूर्ती आली. लहानसहान नाही तर ७१ फूट उंचीची आणि १०८ टन वजनाची. बैठक अवस्थतील भक्त हनुमानाची मूर्ती आहे. अशा प्रकारची ही भारतातील सर्वात मोठी मूर्ती आहे असे म्हटले जाते. इथे हनुमान रामनाम संकीर्तनात मग्न असलेले आहेत. आपण नेहमी वीर हनुमान म्हणजे गदा उंचावलेली किंवा भक्त हनुमान म्हणजे एक गुडघा टेकून नमस्कार मुद्रेत असलेली अशीच हनुमानाची मूर्ती पाहतो. शेजारी गदा आडवी ठेवून, सुखासनात बसलेल...
कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव. गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान. श्री व्याडेश्वर देवस्थान. श्री व्याडेश्वर देवस्थान. तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...